Marathi Biodata Maker

पोलिसांच्या वर्दीतील टोपी बदलली

राज्यातील पोलिसांच्या वर्दीची डोक्यावरील 70 वर्ष जुन्या टोपीने आता रुप बदललं आहे. वाशिम जिल्ह्यातील पोलिसांना नवीन टोपीचं वाटप करण्यात आले आहे. पोलीस गणवेशात बेसबॉल खेळातील टोपीप्रमाणे अतिरिक्त टोपीचा समावेश करण्याचा आदेश पोलिस महासंचालकांनी 24 एप्रिल 2019 रोजी दिला. यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आलं आहे. तर 70 वर्ष जुन्या टोपीची सक्ती केवळ पोलीस कार्यालयीन तपासणी आणि परेडसाठीच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.  या टोपीला येणारा खर्च हा शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळणारे पाच हजार रुपये यामधून करण्यात येणार असल्याचं जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितलं. 
 
पोलिसांना जुनी टोपी वापरताना अनेक अडचणी भेडसावत होत्या. जुनी टोपी डोक्यात व्यवस्थित न बसणे, गुन्हेगारांचा पाठलाग करताना टोपी पडणे अशाप्रकारच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर या नव्या बेसबॉल कॅपच्या वापराचा पर्याय समोर आला. त्यानुसार या बेसबॉल कॅपच्या प्रयोगानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच या नव्या बेसबॉल कॅपचा वापर करण्यात येणार आहे. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

महाराष्ट्राला मुंबई-बंगळूर आणि पुणे-नागपूर मार्गांवर दोन वंदे स्लीपर ट्रेन मिळणार, तयारी सुरू

LIVE: महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग ६ जुलै रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरात सोमनाथ स्वाभिमान पर्व आयोजित करणार

महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग ६ जुलै रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरात सोमनाथ स्वाभिमान पर्व आयोजित करणार

5 लाखांपेक्षा कमी किमतीत नवीन कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Hybrid vs EV: भारतीयांसाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर तुलना

पुढील लेख
Show comments