गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जुलै 2019 (08:28 IST)

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्षावर गुन्हा नोकरीचे आमिष लाखो रुपयांची फसवणूक

सोलापूर जिल्ह्यातील एकास नोकरीचं आमिष दाखवून सुमारे 2 लाख 65 हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा  अध्यक्षावर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात नोकरी लावतो म्हणूनतरुणाकडून 2 लाख 65 हजार उकळल्या प्रकरणी धम्मपाल माशाळकर यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माशाळकर ने विद्यापीठाच्या मुलाखतीसाठी बनावट पत्र दिल्याचा देखील गंभीर आरोप तरुणाने केला आहे. उत्तर सोलापूर येथील रानमसले भागातील किरण भारत चव्हाण तरुणाला अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात क्लर्क, शिपाई पदासाठी जागा निघाल्या आहेत, असं सागितले गेले होते. विद्यापीठातील कुलसचिव असलेले सोनजे माझ्या परिचयाचे असून, तुला या पदावर नोकरी देखील  लावतो. क्लर्क अर्थात लिपिकाच्या जागेसाठी 5 लाख रुपये लागतील असे सांगून किरण चव्हाण यांच्याकडून आगोदर अर्धी रक्कम  2 लाख 65 हजार रुपये घेतले होते. धम्मपाल माशाळकर यांनी मुलाखतीसाठी विद्यापीठाच्या नावे बनावट मुलाखत पत्र मिळाले होते. मात्र किरण याने विद्यापीठात जाऊन याबाबत विचारपूस केली असता, त्याला फसवणूक झाल्याचं समोर आले होगते. किरण यांनी थेट पोलिसात धाव घेऊन धम्मपाल माशाळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.