बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (08:04 IST)

त्र्यंबकेश्वरमध्ये तणाव, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये एका मद्यपीने रात्री नशेत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार  सकाळी उघड झाला. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले. यामुळे गावात कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही, पोलिसांनी त्वरित घटनेचे दखल घेतली आणि विटंबना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांस ताब्यात घेतले आहे. सोबतच सोशल मिडीया आणि इतर ठिकाणी पसरणाऱ्या बातम्या, फोटो , इतर कोणत्याही मजकूर अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले असून संध्याकाळी व्यवहार सुरुळीत झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने एकास ताब्यात घेतले आहे. आता पर्यटक शहरात दाखल होत असून पूजा नित्यनेमाने सुरु झाल्या आहेत.