deepawali
✕

बनावट नोटा बनवणाऱ्या मुख्य आरोपीला अमरावतीमध्ये अटक

Updated: सोमवार, 1 डिसेंबर 2025 (20:40 IST)
ALSO READ: गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यात कुख्यात कुमलीचाही समावेश
नांदगावपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बनावट नोटांच्या गुन्ह्यात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपी सुफियान नगरमध्ये बनावट नोटा छापण्यात सहभागी होता. त्याच्याकडे चलन बनवण्यासाठी लागणारे साहित्य, प्रिंटर, कटर आणि 21,000रुपयांचे बनावट नोटा सापडल्या. 
 
या प्रकरणात पोलिसांनी आधीच संचित अरविंद चव्हाण, दीपक बाबूलाल खंदारे, आदित्य किशोर रामेकर, यश सतीश बर्वे आणि साहिल संजय गडबैल यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 167 बनावट 500 रुपयांच्या नोटा, एकूण 83,500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
ALSO READ: मला १ कोटी रुपये द्या, मी तुम्हाला ११,००० मते मिळवून देतो; चांदवडमध्ये ईव्हीएम 'मशीन डील'ची ऑडिओ क्लिप व्हायरल
तपासादरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की या प्रकरणातील सूत्रधार सतत बनावट नोटा तयार करत आणि प्रसारित करत आहे. या माहितीच्या आधारे,पथक तयार करण्यात आले. छापेमारीनंतर, आरोपीला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा पीसीआर मंजूर केला.
ALSO READ: नागरी निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगावर नाराज
चौकशीदरम्यान, आरोपीने बनावट नोटा छापल्याची आणि त्या पूर्वी अटक केलेल्या आरोपींना पुरवल्याची कबुली दिली. पंचांच्या उपस्थितीत त्याच्या घराची झडती घेतली असता, बनावट नोटा बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य - ग्रीन प्लेटिंग शीट, रबर स्टॅम्प, टेस्टिंग पेपर, कटर, गोंद, प्रिंटर आणि बनावट चलन - जप्त करण्यात आले.
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये सुरू आताच आपले हॉटेल बुक करा

महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट, अपडेट जाणून घ्या

टीव्हीएसची इलेक्ट्रिक स्कूटरबाबत मोठी घोषणा, ग्राहकांना काय फायदा होणार?

गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातील नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव

LIVE: महापौरांनी छत्रपती संभाजीनगरमधील गुंठेवारीला पूर्णविराम दिला

पुढील लेख
Show comments