गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:03 IST)

नवरदेव भर लग्न मंडपात हृद्यविकारच्या धक्क्याने मृत ; वधु सह सर्वाना धक्का

शनिवारी सकाळी मिरजेत लग्नाच्या अक्षतांना केवळ तीन तास राहिले असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना  घडली. या नवरदेवाचे नाव रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे  आहे. त्याचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्याने  झाला. नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.

भूषण दिगंबर कुडाळकर यांची ज्येष्ठ कन्या वृषालीशी मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील  ठरविण्यात आला होता.  मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता. 

रवींद्र त्याच्या घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. मंगल कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते.