मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (12:52 IST)

MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर

result
MHT CET परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून PCM प्रवाहातील 13 तर PCB प्रवाहातील 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. या परीक्षेचा निकाल सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना आपला निकाल  mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. 
 
इंजिनिअरिंग, मेडिकल आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली MHT CET परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांतील 227 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने 13 दिवसात 25 सत्रामध्ये घेण्यात आली होती. पीसीएम आणि पीसीबी या दोन गटांत झालेल्या या परीक्षेत पीसीएम गटातून 13 विद्यार्थ्यांना 10 पर्सेन्टाइल तर पीसीबी गटातून 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेन्टाइल गुण प्राप्त झाले.
 
एमएचटी सीईटी परीक्षेला पीसीएम गटाच्या परीक्षेसाठी 2,82,070 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकीएमएचटी सीईटी परीक्षेला पीसीएम गटाच्या परीक्षेसाठी 2,82,070 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,31,264 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
 
पीसीएम गटाची सीईटी परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान पार पडली होती तर पीसीबी गटाची सीईटी परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान घेतली गेली. 
पीसीबी गटासाठी 3,23,874 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी 2,36,115 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पीसीबी गटासाठी उपस्थिताची टक्केवारी 72.90 टक्के इतकी होती.
 
निकाल कसा तपासायचा -
* सर्वप्रथम परीक्षार्थींनी mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 
* यानंतर होमपेज समोर येईल.
* होमपेजवरील स्कोर कार्ड लिंकवर क्लिक करा.
* आता लॉग इन करा.
* आता तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
mahacet.org वेबसाईटवर पाहता येईल निकाल,