सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (16:20 IST)

ही १७ शहरे सर्वाधिक प्रदूषित

राज्यातील असलेले मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील एकूण  17 शहरे नागरिकांच्या  आरोग्यासाठी हानीकारक आहे असा अहवाल पुढे आला आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित 94 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश झाला आहे.त्यामुळे आपल्या शहराचा विकास सोडा मात्र आपली आरोग्य धोक्यात आले आहे हे नक्की. यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी मुंबइ त्या नंतर नागपूर,नवी मुंबई,उल्हासनगर,बदलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अकोला,अमरावती,चंद्रपूर,जळगाव या शहरांचा समावेश आहे.