Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठा निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेत ‘ऑप्टिंग आऊट’ हा पर्याय कायमचा रद्द केला

Updated: गुरूवार, 14 मे 2026 (12:30 IST)
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) उमेदवारांच्या हितासाठी आणि भरती प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेला 'ऑप्टिंग आऊट' म्हणजेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय आता कायमचा रद्द करण्यात आला आहे.
 
या पर्यायाचा गैरवापर होत असल्याच्या, काळाबाजार आणि आर्थिक व्यवहाराच्या चर्चा/आरोपांमुळे हा निर्णय घेण्यात आला. यापुढे आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा आणि भरती प्रक्रियांसाठी हे पर्याय उपलब्ध राहणार नाहीत. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि गैरवापरमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार २०२२-२३ पासून हा पर्याय सुरू करण्यात आला होता, पण आता तो पूर्णपणे बंद करण्यात आला.आता एकदा निवड झाल्यानंतर पद स्वीकारणे बंधनकारक राहील. भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि न्याय्य होण्याची अपेक्षा आहे. 
ALSO READ: रेल्वे मेगा ब्लॉक: गरीब रथसह अनेक गाड्या रद्द; अकोला रेल्वे प्रशासनाने १४ ते १८ मे दरम्यान विशेष मेगा वाहतूक ब्लॉक जाहीर केला
काय होता 'ऑप्टिंग आऊट' पर्याय?
पूर्वी, एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आणि मुलाखती झाल्यानंतर, अंतिम शिफारस यादी जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांना एक संधी दिली जात असे. जर एखाद्या उमेदवाराची दुसऱ्या एखाद्या चांगल्या पदावर निवड झाली असेल, तर तो या प्रक्रियेतून स्वतःचे नाव मागे घेऊ शकत होता. यालाच 'ऑप्टिंग आऊट' म्हटले जाई.
ALSO READ: नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली असून अहिल्यानगर कनेक्शन आता अधिक गडद झाले; न्यायालयाने आरोपी धनंजय लोखंडेला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला
Edited by-Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

सर्पदंशामुळे ३ आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

LIVE: गडचिरोली जिल्ह्यातील शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

एसटी बस स्थानकांच्या इमारतींना वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप देण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

ठाणे आणि पालघरमध्ये देशद्रोही सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या ५ तरुणांना अटक

कॅडिला फार्माच्या औषधांवर बंदी घातल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले

पुढील लेख
Show comments