Dharma Sangrah

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरीत नाही राहणार

बुधवार, 19 जून 2019 (16:27 IST)
राज्यातील बहुचर्चीत व वादात अडकलेला सोबतच स्थानिक जनतेचा जोरदार विरोध असलेला नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प (Nanar refinery project) आता कोकणातील रत्नागिरीतून रायगड जिल्ह्यात हलवण्यात येणार आहे. नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडला स्थलांतरित करण्याबाबत स्थानिकांचा विरोध नाही, असं लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिल आहे त्यामुळे मोठ्या राजकीय वादाला विराम मिळाला आहे. येथील 40 गावातील ग्रामस्थांचा प्रकल्पाच्या भूसंपादनाला कोणताही विरोध नाही. तर अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन येथील 40 गावं प्रकल्पाच्या बाजूने आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिकांच्या आणि राजकीय विरोधामुळे नाणार रत्नागिरी येथून तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडला हलवल्याचं मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर सांगितले आहे. कोकणातील निसर्गसंपन्न रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा जोरदार विरोध केला, त्यामुळे शिवसेनेने मुद्दा लावून धरला होता. शिवसेनेने भाजपसोबत युती करताना नाणार रद्द करण्याची अट ठेवली होती. ही अट भाजपकडून मान्य करण्यात आली आहे. तर 2 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या अखेरच्या फाईलवर सही केली होती. त्यामुळे आता मोठ्या वादावर पडदा पडला आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: शरद पवार गटाने महागाईच्या निषेधार्थ रस्त्यावर चूल पेटवली

ईडीच्या कारवाई नंतर, नाशिक पोलिसांनी अशोक खरात यांच्या रिमांडची मागणी केली

महायुतीत बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

अमेरिकेतील टेक्सास मध्ये तरुणाने भारतीय तिरंगा फाडला, भारतविरोधी घोषणा दिल्या

इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे कुवेत विमानतळाचे मोठे नुकसान, विमानसेवा स्थगित, अनेक जण जखमी

पुढील लेख
Show comments