शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जून 2019 (16:29 IST)

शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचे वर्धापन दिनाचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 19 जून च्या 53 व्या वर्धापन दिनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी 5 वाजता शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच अन्य पक्षातील मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या सरकारी योजनांची कार्यवाही, यासंदर्भात शिवसेनेचे मंत्री, नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.