Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नांदेड : नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भाजपला स्पष्ट बहुमत

Updated: शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (09:01 IST)
 
१३ डिसेंबर रोजी पालिकेसाठी मतदान झाले होते़ १४ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली़ यात भाजपाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत ९ जागा पटकाविल्या़ राष्ट्रवादी काँग्रेसने ६, काँग्रेसने २ तर एका अपक्षाने बाजी मारली़ भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद मच्छेवार यांनी काँग्रेसचे शेख चाँदसाब रतनजी यांचा पराभव केला़ मच्छेवार यांना ६ हजार ३५८ तर शेख चाँदसाब यांना ४ हजार ५४७ मते मिळाली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर हबीबोद्दीन चव्हाण यांनी २ हजार ९८१, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रवीण राठोड यांना २ हजार ७४८, शिवसेनेचे सुनील पाटील यांना केवळ १ हजार ३०२ मते मिळाली.
 
नगरसेवक पदासाठी विजयी प्रमुख उमेदवारात भाजपाचे व्यंकटराव नेम्मानीवार, श्रीनिवास नेम्मानीवार, अजय चाडावार, शिवाजी आंधळे, खान इम्रानखान इसा (काँग्रेस), अभय महाजन (काँग्रेस), कैैलास भगत (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे़ विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे सुनील पाटील, सूरज सातुरवार, राष्ट्रवादीच्या प्रियंका राठोड, इंदुताई कनाके, काँग्रेसचे कृष्णा नेम्मानीवार यांना मतदारांनी नाकारले.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नागपुरात दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून; गुन्हा लपवण्यासाठी रचले खोटे नाटक

नाशिकच्या मसुदा मतदार यादीतून १०.२७ लाखांहून अधिक नावे वगळली

सणासुदीच्या काळात बनावट खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर एफडीए कारवाई करणार

मराठा आरक्षणाच्या लढाईत मराठा आणि ओबीसी पुन्हा एकदा आमने सामने आले

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दप्तराचे वजन १०% पेक्षा जास्त नको; शिक्षण विभागाचा आदेश

पुढील लेख
Show comments