शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (09:07 IST)

कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे मंगळवारी निधन झाले. कामगार केसरी म्हणून नावलौकिक असलेले रामभाऊ रुईकर यांच्या त्या कन्या आहेत. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोपरांत देहदान करण्यात आले आहेत. मालतीताई यांनीही वडिलांचा वसा आयुष्यभर प्रामाणिकपणे जोपासला. मालतीताई समाजकार्याची पदवी घेऊन मुंबईहून नागपूरला परतल्या, त्याच वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी महाराष्टची स्थापना झालेली नव्हती व हा भाग सी.पी. अ‍ॅन्ड बेरारमध्ये समाविष्ट होता. शासनाने त्यांना लेबर आॅफिसर म्हणून नियुक्ती दिली. स्वत: अविवाहित राहून त्यांनी बहीण, भावांचे शिक्षण व कौटुंबिक जबाबदारी पार पाडली. पुढे स्वतंत्र महाराष्टत कामगार उपायुक्त म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यांनी हिंद मजदूर सभेची स्थापना केली. त्यावेळी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे माकप नेते भाई बर्धन आणि वसंतराव साठे यांच्याप्रमाणेच या भागात कामगारांच्या चळवळीला चालना दिली.