मध्यवर्ती कारागृहात आढळले पुन्हा मोबाईल
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा ८ मोबाईल आढळले आहेत. तीन दिवसापूर्वी येथे सराईत गुन्हेगाराकडून ७ मोबाईल सापडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा येथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
अनेक गैरप्रकारांमुळे कारागृह सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असून गेल्या काही महिन्यांपासून नेहमीच गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.तर गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत की सुट्टी घालवत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.