Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात होणार हे सारे भरगच्च कार्यक्रम

Updated: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (08:08 IST)
दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी ‘स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक या विषयावर परिचर्चा असणार आहे. चर्चाकार प्रा. एकनाथ पगार हे असतील. यामध्ये श्रीमती सुहास जोशी, श्रीमती रेखा इनामदार साने, डॉ. गजानन जाधव आणि डॉ. मोना चिमोटे हे सहभागी असतील.
दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी कथाकथनाचा कार्यक्रम श्री. विलास सिंदवीकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी सर्वश्री. गिरीश देसाई, विद्याधर बनसोड, बाबासाहेब परीट, राजेंद्र डाहळ यांस कथाकथनासाठी निमंत्रित केलेले आहे.
 
संमेलन काळामध्ये दि. ४ आणि ५ डिसेंबर २०२१ असे दोन दिवस मिळून विविध परिसंवादांचे आयोजन केले आहे.
‘कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहारे – या विषयावर श्री. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये सर्वश्री मकरंद कुलकर्णी, डॉ. आशुतोष रारावीकर, विनायक गोविलकर, डॉ. हंसराज जाधव आणि दीपक करंजीकर हे वक्ते म्हणून असतील.
‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पावले मागे – श्री. शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया या परिसंवादामध्ये वक्ते श्रीमती लता नार्वेकर, सर्वश्री. पराग घोंगे, डॉ. सतीश साळुंके, सुबोध भावे आणि प्राजक्त देशमुख यांस निमंत्रित केले आहे.
‘शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका – श्री. भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया या परिसंवादामध्ये आ. बच्चू कडू, श्री. रमेश जाधव, श्री. मिलींद मुरुगकर व श्री. संजय आवटे यांचा सहभाग अपेक्षित आहे.
 
‘ऑनलाईन वाचन : वाङमय विकासाला तारक की मारकङ्क – डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या  या परिसंवादामध्ये वक्ते म्हणून श्रृतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डॉ. बिलास साळुंके, मयुर देवकर यांचा सहभाग अपेक्षित आहे.
साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड – डॉ. निलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, डॉ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफगाण, प्रा. भास्कर ढोके यांचा सहभाग असेल.
गोदातिरीच्या संतांचे योगदान – श्री. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया या परिसंवादामध्ये श्रीमती धनश्री लेले, प्रा. विवेक अलोणी, चारुदत्त आफळे, डॉ. दत्तात्रय घुमरे, गीता काटे, बिशप थॉमस डाबरे यांस वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे.
साहित्य संमेलनाला जोडून यावर्षी प्रथमच बाल साहित्य मेळावा होत आहे. दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी या मेळाव्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखक श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये सर्वश्री सुर्यकांत मालुसरे, प्रा. पृथ्वीराज तौर, संजय पेंडसे, आश्लेषा महाजन, विनोद दसकर, किरण भावसार, संदिप देशपांडे, संजय वाघ, प्रशांत गौतम व संतोष हुदलीकर यांचा सहभाग असेल.
संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांचे वैशिष्ट्यपूर्ण असे कलाप्रदर्शनही तेथे आयोजित केले आहे.
कुसुमाग्रजनगरीमध्ये सर्व रसिक नागरिकांच्या माहितीसाठी नाशिकच्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
संमेलनस्थळी कविकट्ट्याचे आयोजन केले असून हा कविकट्टा सलग २ रात्री चालेल अशी अपेक्षा आहे. याचे संयोजन राजन लाखे, संदिप देशपांडे आणि संतोष वाटपाडे हे करणार आहेत.
नाशिक जिल्हा स्थापनेला १५० वर्ष झाली आहेत. या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी श्री. सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.संमेलनाचा समारोप रविवार दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता होईल.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

थरारक: थायलंड येथे शाळेत घुसून गोळीबार, 7 जणांचा मृत्यू

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या २५ व्या वर्षी निवृत्त घेतली

मुंबई 'मिसिंग लिंक' बोगद्यात भीषण अपघात, फॉर्च्युनरने टेम्पोला धडक दिल्याने व्यावसायिकचा मृत्यू

श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला; शुभमन गिलला दुखापत

LIVE: महाराष्ट्र सरकारने क्रिप्टो मालमत्तेचा समावेश करण्यासाठी एमपीआयडी कायद्यात दुरुस्ती केली

पुढील लेख
Show comments