Marathi Biodata Maker
✕

पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर १० लाख सायबर हल्ले

Updated: शुक्रवार, 2 मे 2025 (09:17 IST)
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सायबर पोलिसांचे एडीजी यशस्वी यादव म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. ते म्हणाले की, हे केवळ काही हॅकर्सचे कृत्य नाही तर ही एक संघटित मोहीम आहे जी भारतातील महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करत आहे. या हल्ल्यांमध्ये भारतीय सैन्य, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, बँकिंग क्षेत्र आणि ई-गव्हर्नन्स पोर्टल यासारख्या संस्थांना प्रामुख्याने लक्ष्य केले जाते. या सायबर युद्धात सहभागी असलेल्या गटांमध्ये सर्वात वरचे नाव टीम इन्सेन पीके आहे, जे एक पाकिस्तानी सायबर गट आहे. या गटाने लष्कर, हॉटेल्स आणि शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइट्सवर हल्ला केला आहे. याशिवाय, मिस्ट्रियस टीम बांगलादेश (MTBD) नावाचा एक बांगलादेशी गट देखील यामध्ये सक्रियपणे सहभागी आहे, ज्याने ई-गव्हर्नन्स पोर्टल आणि बँकांना लक्ष्य केले आहे. तसेच या सर्व गटांमध्ये समन्वय आहे आणि ते एकत्रितपणे भारताची सायबर सुरक्षा कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. यशस्वी यादव म्हणाले की, सायबर हल्ले प्रामुख्याने अशा वेबसाइटवर झाले आहेत ज्या भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांशी जोडल्या गेल्या आहे, जसे की रेल्वे, बँकिंग प्रणाली आणि सरकारी पोर्टल. गेल्या आठ दिवसांत दहा लाख सायबर हल्ले आढळून आले आहे. असे देखील ते म्हणाले.
ALSO READ: लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता अडकला आहे का? खात्यात १५०० रुपये कधी येणार हे मंत्र्यांनी सांगितले

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

सौदी विमानतळांवरील क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे घबराट, भारतीयांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला

नाना पाटेकर यांचा अंत्यसंस्कार सूर्यास्तानंतर का झाला? पुत्र मल्हारने कारण सांगितले

MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली

LIVE: MPSC आंदोलन पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनामुळे मुंबई राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द

पुढील लेख
Show comments