महाराष्ट्र सरकार प्रशासकीय सुधारणा, महिला आणि बालविकास विभागात प्रथम क्रमांकावर
Maharashtra News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाला पहिला आणि सर्वोत्तम विभाग म्हणून घोषित करण्यात आले.
मिळालेल्या माहितनुसार हा कार्यक्रम सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा पाया रचण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यामध्ये प्रत्येक विभागाला निश्चित उद्दिष्टे देण्यात आली आहे.
महिला आणि बालविकास विभागाला ८० गुण मिळाले, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला ७७.९४, कृषी विभागाला ६६.५४, ग्रामीण विकास विभागाला ६३.५८ आणि वाहतूक आणि बंदरे विभागाला ६२.२६ गुण मिळाले.
Edited By- Dhanashri Naik