suvichar
✕

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नेटकरी संतापले!; कारण “हे” आहे

Updated: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (08:53 IST)
 
दोन दिवसांपूर्वी पालघरमधल्या काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला आहे. याचे फोटो एकनाथ शिंदे यांनी स्वतः आपल्या ट्वीटरवरुन शेअर केले होते. या फोटोमध्ये या माणसांच्या मागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा बोर्ड दिसत आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री कार्यालयामध्ये झाला का? अशी शंका उपस्थित झाली आहे. जर हे खरे असेल तर पक्षाचे असे खासगी कार्यक्रम सरकारी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कशाला?
 
त्यामुळे नेटकऱ्यांनी देखील या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या पक्षाचे कार्यालय नसल्याने असे करावे लागतेय, असे काही जणांचे म्हणणे आहे. तर काही जणांनी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पक्षाचे कार्यक्रम घेणे चूक आहे, असे मत मांडत या गोष्टीचा निषेध केला आहे. आता हा पक्षप्रवेश झाला ते नक्की मुख्यमंत्री कार्यालयच होते का? जर तसे असेल तर अशा पद्धतीने सरकारी कार्यालयामध्ये पक्षाचा कार्यक्रम घेणे योग्य आहे का? अशा जनतेच्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच उत्तर द्यावे म्हणजे या चर्चांना पूर्णविराम लागेल. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: नागपूरमध्ये आजपासून 'एअर फेस्ट २०२६' सुरू होणार

मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण; खासदार पार्थ पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

पालघर जिल्ह्यातील वाडा-भिवंडी महामार्गावर महिलेला ट्रकने चिरडले

मलेशियाला प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी धक्कादायक बातमी! आता व्हिसाशिवाय प्रवेश नाही; नियम वाचा

वंदे भारत स्लीपरमध्ये आता झुणका भाकर आणि पुरणपोळीची चव चाखायला मिळणार; आयआरसीटीसी नव्या तयारी

पुढील लेख
Show comments