1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (08:40 IST)

मुंबई गोवा महामार्गावर गाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

Tara Village on Mumbai Goa Highway  A man's dead body was found  Minister Narayan Rane Maharashtra News In Marathi
मुंबई गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत शुक्रवारी ऑडी एमएच.14 जीए.9585 या क्रमांकाच्या गाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महामार्गावर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा फार्म हाऊस आहे. या फॉर्महाऊस लगत हा मृतदेह मागील दोन दिवसांपासून गाडीत आहे.
 
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित गाडी पुणे जिल्ह्यातील आहे. गाडी लॉक असल्याने गाडीतील मृयदेह बाहेर काढण्यास पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र एस्पर्टच्या मदतीने गाडी खोलण्याचा प्रयत्न करत होते. गाडीतील संशयास्पद मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बघ्यांचीदेखील मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. संबंधित घटना अपघात आहे की घातपात आहे? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
 
मुंबई गोवा रोडवर ऑडी कारमध्ये बॉडी सापडली होती त्याचे नाव संजय कारला असे असून त्याच्या छातीतीत चार गोळ्या मारल्याचे समोर येत आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor