सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (21:33 IST)

पुन्हा एकदा विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

नाशिकमध्ये पुन्हा एकदा महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. यात तीन ते चार मुली या ठिकाणी हाणामारीमध्ये एकमेकींच्या झिंजा ओढताना दिसत आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर  चांगलाच व्हायरल होत आहे. मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. तर बघ्यांनी हा फ्रीस्टाइल हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला.
 
या विद्यार्थिनींमध्ये हाणामारी का झाली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये. मात्र समाज माध्यमांवर मुलींमधील या ‘दंगल’चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पहिला तर हा सर्व प्रकार महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये घडलेला असावा असे दिसून येत आहे. या आधीही नाशिकमध्ये विद्यार्थिनींच्या मारामारीचे असेच व्हिडिओ समोर आले आहेत. 
Edited by : Ratnadeep Ranshoor