सीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल तर कल्याण-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल. तर हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-पनवेल (डाउन) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल सोडली जाईल. पनवेल-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. 31 डिसेंबरच्या रात्री बाहेर सेलिब्रेशन करायला गेलेली लोक सार्वजनिक वाहतुकीच्या कमरतेमुळे कुठेही अडकू नये, यासाठी सुविधा दिली जाणार आहे.