मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2017 (15:47 IST)

पाकिस्तान मुर्दाबाद : कुलभूषण यांच्या परिवाराचा अपमान, लोकसभेत पडसाद

आपल्या देशाचे नागरिक माजी सैन्य अधिकारी सध्या पाक मध्ये तुरंगात आहे. पाक ने त्यांच्यावर चुकीचे आरोप केले आहे. यामध्ये कुलभूषण जाधाव यांना भेटायला गेलेल्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुक दिली याचे पडसाद लोकसभेत उमटले आहे. लोकसभेत यावेळी निषेध करण्यात आला असून लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंतांच्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत. जेव्हा लोकसभेचे कामकाज सुरु झाले तेव्हा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत. तर लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी सावंतच्या घोषणांना पाठिंबा दिला आहे. यात सुमुत्रा माहाजन यांनी लोकसभा खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढत गेला आणि लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केले गेले होते. यामध्ये जेव्हा त्या दोघी पाकला गेल्या तेव्हा, आई आणि पत्नीला सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत कपडे बदलायला लावल होते. सोबत सौभाग्याचं लेणं असेलेली टिकलीही काढून ठेवायला लावली होती. तर त्यांचे बुटही त्यांना दिले नाहीत. भेटीच्या खोलीत जाण्याआधी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. या चुकीच्या वागणुकीचा सर्वत्र निषेद होत आहे.