बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (19:59 IST)

कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

suicide
Onion farmer commits suicide नाशिकच्या देवळा  तालुक्यातील सातवाईवाडी येथे हताश झालेल्या कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने घराजवळच्या विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रताप बापू जाधव (३६) असे आत्महत्या करणा-या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे.
 
प्रतापने यावर्षी कांदा लागवड करून त्याच्यासाठी मोठा खर्च केला होता. मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळाला. त्यातच साठवलेला कांदा खराब झाला. त्यामुळे घेतले कर्ज कसे फेडायचे आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा या विवंचनेत तो होता. त्यातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सततची नापिकी आणि या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळेही तो चिंतेत होता.
 
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. घरातील लोकांना पहाटे तो न दिसल्यामुळे त्यांनी शोध घेतला असता त्यांचे स्वेटर विहिरी जवळ दिसल्याने ही घटना समोर आली.