रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2023 (20:53 IST)

ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड’ सुषमा अंधारेंची सूचक प्रतिक्रिया …

Sushma Andhare
महाराष्ट्राचा सत्तासंघर्षाचा निकाल लागला असून कोर्टाने शिंदे गटाला दिलासा दिला आहे.निकालानंतर अनेक नेतेमंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
 
‘ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा सत्तासंघर्षाचा निकाल वाचून दाखवला.16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून आमदारांना पात्र ठरवायचे की अपात्र ठरवायचे हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आला आहे.
 
दरम्यान सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं कि ”ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड’ असे म्हटले आहे. जी काही शस्रक्रिया होती, ती यशस्वी झाली, मात्र रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनतर त्यांनी दुसरी फेसबुक पोस्ट केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor