पावन गडावर शिवकालीन तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला

pawan fort
Last Modified शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (08:37 IST)
पन्हाळा गडाजवळ असलेल्या पावन गडावर तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला. गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू असताना तोफ गोळे सापडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तोफगोळे शिवकालीन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पन्हाळा गडाच्या शेजारी चार किमी अंतरावर पावनगड आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. तो पन्हाळा गडाचा संरक्षक गड मानला जातो. रेडेघाट परिसरात तो असून वन विभागाच्या ताब्यात आहे. येथे वनविभाग आणि ‘टीम पावनगड’ या संघटनेच्यावतीने विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे.

फलक लावण्यासाठी खड्डा खोदला जात असताना महादेव मंदिरा शेजारी तोफगोळ्यांचा साठा सापडला. त्याचे मोजमाप केले असता चारशेवर तोफगोळे असल्याचे आढळून आले.१०० ते २५० ग्राम वजनाचे तोफगोळे आहेत. ते एकावर एक असे रचून ठेवले होते. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी दारूगोळ्याचे कोठार होते. या परिसरात आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे. या भागात तोफगोळ्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर ...

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर 54 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ लस
सकाळी नऊ नंतर टोकन वाटप सुरु, गर्दी न करण्याचे आवाहन

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे ...

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात ...

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार; चंद्रकांत पाटलांनी शिकवू नये- ...

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार; चंद्रकांत पाटलांनी शिकवू नये- खासदार संभाजीराजे
मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे माझी नेमणूक कोणाच्या सांगण्यावरून झालेली नाही, ...

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल ...

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल कोल्हे
खेड तालुक्यातील प्रास्तावित रेल्वे आणि रिंगरोड हे दोन्ही प्रकल्प आहेत. ठिकठिकाणी ...

निर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

निर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
मागील काही दिवस सतत पावसाचा शिडकाव झाल्याने राज्यातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य अधिक खुलून ...