Festival Posters
✕

कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कैद्यांना मिळणार पगारवाढ..!

Updated: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (20:27 IST)
 
याबाबत सविस्तर…
अमिताभ गुप्ता यांनी हि माहिती आज (१९ ऑगस्ट) रोजी दिली आहे. या पगारवाढीचा ७ हजर कैद्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी कारागृहांमध्ये विविध उद्योग सुरु करण्यात आलेले आहेत. या कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणारे कैदी हे बऱ्याच दिवसांपासून ज्या प्रमाणे विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी ठराविक कालावधीनंतर महागाई लक्षात घेता पगारवाढ होत असते त्याच धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या बंद्यांना पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करत होते. अखेर त्यांची मागणी मान्य झाली आहे.
 
कारागृह उद्योगात काम करणाऱ्या कुशल बंद्याना प्रती दिवस 74 रुपये, अर्धकुशल बंद्याना 67 रुपये, अकुशल बंद्याना 53 रुपये तर खुल्या वसाहतीतील बंद्यांना 94 रुपये अशी भरघोस पगार वाढ देण्यात आली आहे.राज्यातील सर्व 60 कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी सात हजार कैदी काम करत आहेत. यामध्ये पुरुष कैदी हे 6 हजार 300 व महिला बंदी 300 च्या आसपास आहेत.
 
कारागृहाच्या भिंतीआड कैद असलेल्या कैद्यांना त्यांच्या सुधारणा व पुनर्वसनावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. कारागृहातुन सुटका झाल्यानंतर त्यांना समाजामध्ये सन्माननीय नागरिक म्हणून पुनर्वसन करण्याचा दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी निरनिराळे व्यवसाय आणि कला यांचे शिक्षण देणारी विविध उद्योग कारागृहांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. कारागृहातील सर्व उद्योग हे प्रशिक्षण आणि उत्पादन पद्धतीच्या धरतीवर आहेत. कैद्यांना तिच्या उद्योगांमध्ये काम करतात त्या उद्योगाचे प्रत्यक्षिक सिद्धांतातील ज्ञान मिळते. कारागृहातील सुटल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना या उद्योगांची मदत होईल.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: पुणे शहरात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूविरोधात मोठी कारवाई

पुण्यात एफडीएची दोन ठिकाणी धाड; ६७ लाख रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखू जप्त

पाण्यावरून धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक फेरी; गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ अवघ्या अर्ध्या तासात

EV अवतारात Suzuki Ignis ची वापसी: २६ kWh बॅटरी आणि ९० hp सह ३१० किमी रेंजचा दावा

साखरेचे भाव पुन्हा वाढणार का? उत्पादनात ५% घट होण्याचा अंदाज; महाराष्ट्र आणि कर्नाटक सर्वाधिक प्रभावित होणार

पुढील लेख
Show comments