विरोधकांना पुढील 25 वर्ष निवांत वेळ मिळो ; खासदार संजय राऊत यांच्यावर उदय सामंत यांची टीका
निवडणुकीच बिगुल वाजल्याची अनेकांना जाणीव झालीय. विरोधकांकडे भरपूर वेळ आहे असाच निवांत वेळ त्यांना पुढचे वीस-पंचवीस वर्षे मिळो, अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करेन. त्यांना दुसरं काहीही काम नाही रोजच ते बोलत असतात रोजच त्यांचा इव्हेंट चालू असतो,अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. आज ते कोल्हापुरात बोलत होते.आमच्या नेत्यांबद्दल नाराजी सांगणारी जी सूत्र आहेत त्यांचीच एसआयटी चौकशी लागली पाहिजे असेही ते म्हणाले.
महविकास आघाडी संदर्भात बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सध्या जे काही राजकारण चालू आहे त्यानुसार नेत्यांना स्वबळावर लढण्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांची जरी भेट झाली असली तरी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल ही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Edited By - Ratnadeep ranshoor