Daily Horoscope
✕

राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार

Updated: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (09:00 IST)
 
याबाबत स्वत: राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले की, २७ नोव्हेंबरला मुंबईतील पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडेल. त्यानंतर २८ किंवा २९ नोव्हेंबरला मी कोकणच्या दौऱ्यावर निघणार आहे. सुरुवातीला मी कोल्हापूरला जाणार आहे. त्याठिकाणी देवीचं दर्शन घेऊन पुढील कोकणच्या दौऱ्यावर जाणार आहे असं त्यांनी म्हटलं. मनसेच्या सलग्न संघटनांतील समस्या, अडचणी दूर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
 
मग राज ठाकरे संकुचित कसा?
माझं पहिल्यापासून मत असेच होते की, पंतप्रधान हे देशाचे आहेत. सर्व राज्यांसाठी त्यांची भूमिका असायला हवी. महाराष्ट्रातून हा प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट नसते वाटले. परंतु जो प्रकल्प राज्याबाहेर जातोय तो गुजरातलाच जातोय याचे वाईट वाटते. राज ठाकरे महाराष्ट्राबद्दल बोलतो मग तो संकुचित कसा? प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत. तिकडच्या स्थानिकांना रोजगार मिळायला हवा. प्रत्येक राज्यात उद्योग गेले तर देशाचा विकास होईल. आजही महाराष्ट्र उद्योगधंद्यामध्ये इतर राज्यांपेक्षा पुढे आहे. उद्योगपतींनाही महाराष्ट्र राज्य प्रथम पसंतीचं वाटतं असं राज ठाकरेंनी म्हटलं. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या चार मित्रांवर काळाचा घाला! सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर चौघांचा मृत्यू

जनावरांसाठी चारा टंचाई टाळायची? कमी खर्चातील चारा नियोजन कसे करावे?

LIVE: औषधविक्रेते एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर नाराज

मीरा-भयंदर येथील चेना गावाच्या जंगलात प्राणी समजून गोळी झाडली! महानगरपालिका कर्मचारी ठार, डॉक्टरसह ६ जणांना अटक

खामगावजवळ भीषण अपघात; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या गाडीला ट्रकची धडक

पुढील लेख
Show comments