रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (09:17 IST)

भाजप युतीच्या बाजूने :दानवे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. भाजप युतीच्या बाजूने आहे. हे आम्ही जाहीरपणे सांगतो आहे असे  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे. ते जालन्यात बोलत होते.
 
शिवसेनेच्या भाषेवर आमचे ऑब्जेक्शन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युतीसंदर्भात कोणताही नवा प्रस्ताव नाही. फक्त बसायचे आणि युतीची घोषणा करायची इतकेच बाकी आहे. मात्र युती करायची की नाही हे शिवसेनेवर अवलंबून असल्याचेदेखील दानवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे युतीचा चेंडू भाजपने शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे.