Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवृत्त सैनिकाने केला अंधाधुंद गोळीबार

Updated: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (16:10 IST)
 
घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या निवृत्त सैनिकास ताब्यात घेतले. संदीप रमेश बांदल (वय ४२ रा. करांडे मळा, जामखेड रोड, भिंगार) असे निवृत्त सैनिकाचे नाव आहे.
 
पोलीस हवालदार जालिंदर नामदेव आव्हाड यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निवृत्त सैनिक संदीप बांदल विरोधात भादंवि १८६, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार अधिनियम, मुंबई पोलीस अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आरोपी बांदला पोलिसांनी अटक केली असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करणार आहेत. सोमवारी रात्री बांदलने भिंगार येथील सोलापूर टोल नाक्यावर हुज्जत घातली. जाणार-येणाऱ्या वाहनांना त्याने टोल न भरण्यास सांगितले. गस्ती पथकावरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या घरी सोडले.
 
यानंतर त्याने त्याच्याकडील परवानाधारक बंदूक लोड करून घराच्या परिसरात अंधाधुंध गोळीबार केला. गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बांदल याला ताब्यात घेतले.
यावेळी त्याने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत मोठ मोठ्याने आरडाओरडा केला. पोलिसांनी त्याच्याकडील परवानाधारक बंदूक जप्त केली आहे.भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी, पोलीस हवालदार आव्हाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करत आहेत.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुंबईत १ सप्टेंबरपासून दूध ९ रुपये लिटर ने महागणार

हॉकी इंडियाची मोठी घोषणा; महिला संघाला ५० लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळणार

भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने ग्रँड चेस टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले

नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले

महिला टी२० आशिया कप सुरु; ५ सप्टेंबरला दुबईमध्ये भारत-पाकिस्तान सामना

पुढील लेख
Show comments