शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (17:18 IST)

RIP जवान पप्पाला भानूप्रसाद

हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेले जवान कॉन्स्टेबल पप्पाला भानूप्रसाद ( वय 35 वर्षे राहणार आंध्र प्रदेश ) हे कर्तव्यावर होते. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ते डिपार्टमेंटच्या गाडीतून आपल्या फोर्समधील डॉक्टरला घेण्यासाठी नांदेडकडे निघाले होते. चालक आणि जवान जात असताना डोंगरकडा ते नांदेड रस्त्यावर डोंगरकडा पासून तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
 
याठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे वाटेत मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात गाडी आदळल्याने भानुप्रसाद यांच्या रायफलमधून गोळी सुटून थेट छातीत बसली. यानंतर भानुप्रसाद यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतू तेपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी भानूप्रसाद यांना मृत घोषित केलं. सशस्त्र सीमा बलाच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी अद्याप प्रतिक्रीया दिलेली नाहीये. बाळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनेचा तपास करत आहेत.