शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 23 मार्च 2022 (18:05 IST)

रुपाली चाकणकरांचा राजीनामा

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा (Ncp Women President) राजीनामा दिला आहे. सध्या रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यानंतर सहाजिकच महिला प्रदेशाध्यक्ष पदही रिकामे झाले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आलं होतं.
  
आता महिला प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. त्यामुळे त्यांचे ते काम पाहता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.