गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (08:34 IST)

हिजाब वाद प्रकरण; ”महाराष्ट्रात खपवून घेणार नाही”, रुपाली चाकणकरांचा इशारा

कर्नाटकातील हिजाबचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. तर हिजाबच्या वादाचे पडसाद राज्यातही उमटू लागले आहेत. या प्रकरणावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे.तसेच महाराष्ट्रात ही घटना खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच दिला आहे. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या  धुळे दौऱ्यावर होत्या.
 
पिंपरी चिंचवड येथे अकरा वर्षीय नाबालिक मुलीवर वडिलांच्या मित्राने वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या घटना घडली होती. या घटनेची दखल रुपाली चाकणकर घेत आरोपींवर मरेपर्यंत फाशीची शिक्षाची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या संदर्भात जनजागृती करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
 
हिजाब परिधान करण्यावरून सुरू असलेल्या वादावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोलताना स्पष्ट केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नुसार सर्वांना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे, आणि अशा निर्णयावर जर कोणी गदा आणत असेल तर ती निंदनीय बाब आहे, आणि महाराष्ट्र मध्ये ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करीत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.