शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (21:18 IST)

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अस्थिंचे होणार रामकुंडात विसर्जन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अस्थिंचे देशभरातील पवित्र नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येत असून, गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी गोदावरी नदीत अस्थिंचे विसर्जन करण्यात येणार आहे.
 
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ०६ फेब्रुवारीला निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार झाले होते. यावेळी येथे मोठा जनसागर लोटला होता. परंतु इच्छा असून, ज्यांना अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही, अशा लोकांना त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार आहे.
 
लता मंगेशकर यांच्या अस्थी उद्या गुरुवारी सकाळी आठ वाजता रामकुंडात विसर्जनासाठी येणार आहेत. त्यांच्यासोबत आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मिलिंद नार्वेकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.