1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (16:03 IST)

Propose Day ला कॉलेज तरुणांच्या दोन गटांत हाणामारी

Two groups of college youth fight on Propose Day in Nasik
नाशिक जिल्ह्यातील कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रपोज डे दिवस साजरा होत असताना ही हाणामारी झाली. 
 
नाशिक जिल्ह्यातील निफाड गावात कॉलेज कॅम्पसमध्ये दोन गटात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला गेला असून व्हायरल झाला आहे. 
 
मंगळवारी Propose Day च्या दिवशी विद्यार्थ्यांच्या दोन गटात काही कारणावरून वाद झाले आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेनंतर महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.