रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (15:50 IST)

नितेश राणे यांना जामीन मंजूर

Bail granted to Nitesh Rane
संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. आमदार नितेश राणे यांना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली आहे. 
 
या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली होती, त्यावर आज सिंधुदुर्ग न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत आज निर्णय दिला आहे.  
 
आमदार नितेश राणेंना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तब्येतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात हलवले गेले. आता सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.