सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (08:29 IST)

संजय राऊत तुमची जागा आता बाहेर नाही, तुमची जागा आता आत - :नारायण राणे

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर (ईडी) करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्याला आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत तुमची जागा आता बाहेर नाही, तुमची जागा आता आत असे म्हणत राणेंनी राऊतांवर हल्लाबोल चढवला आहे. सध्या शिवसेना विरुद्ध राणे हा वाद पुन्हा पेटला आहे. तुम्ही फक्त मातोश्रीपुरते मर्यादीत आहात, असा टोलाही राणेंना लगावाल आहे. 
 
नारायण राणेंनी ट्विट करत म्हटले आहे की, तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा. कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही. संजय राऊत यांचे वक्तव्य, मुंबईचा दादा “ शिवसेना ” पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस आता संपले आहेत. असा गर्भित इशारा देणारे ट्विट नारायण राणे यांच्याकडून करण्यात आलं आहे.