Dharma Sangrah
✕

संजय राऊत यांनी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत- देवेंद्र फडणवीस

Updated: मंगळवार, 28 मे 2024 (09:21 IST)
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निराशा व्यक्त करत राऊत यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राऊत यांच्या वक्तव्यात विश्वासार्हता नाही. एवढेच नाही तर राऊत लंडनमध्ये असून, योग्य मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
 
संजय राऊत यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी काम केल्याचा आरोप केला होता. तसेच  अमितशाह योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. असं राऊतांनी भाकीत केलं आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  यावर फडणवीस यांनी तिखट प्रतिक्रिया देत राऊत यांचे वक्तव्य फेटाळून लावले. जे लोक गांजा पिऊन नशेत लिहितात त्यांच्यावर मी भाष्य करत नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
 
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी फडणवीस यांना राऊत यांच्या मोदी, शहा आणि खुद्द फडणवीस यांच्याशी संबंधित वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. आपल्या जुन्या भूमिकेवर ठाम राहून फडणवीस यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर कोणतेही वक्तव्य करण्यास स्पष्टपणे नकार दिला.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सावधान! सोन्यामध्ये रेनियम आणि इरिडियमची भरपूर भेसळ, लक्षपूर्वक घ्या

कार्तिकी एकादशी दिवशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह पंढरपूर येथे शासकीय महापूजा केली

LIVE: कार्तिक एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा केली

मुंबईत अल्पवयीन मुलांकडून कपलला बेदम मारहाण; ८ मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

भयंकर: मणिपूरमध्ये विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू; १०० हून अधिक रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments