राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरात घट पाहायला मिळत आहे. यात वाशिम जिल्हा आघाडीवर असून वाशिममध्ये लिंग गुणोत्तरात 62 टक्क्यांची घट झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. वाशिमपाठोपाठ पुण्यासह उस्मानाबादमध्ये लिंग गुणोत्तरात घसरण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये 53 टक्क्यांनी मुलींचा जन्मदर घटल्याचं समोर आलं आहे. राज्यातील एकंदर लिंग गुणोत्तर घटलं असलं तरीही भंडारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जवळपास 78 टक्क्यांनी वाढला आहे. भंडारा पाठोपाठ परभणी आणि लातूरमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.