Festival Posters
✕

शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै होणार

Updated: शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:48 IST)
 
राज्य सरकारकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ही 20 जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 
 
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा व विद्यार्थ्यांकडून जानेवारीमध्येच नोंदणी करून घेण्यात आली होती. 25 जानेवारीपर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये 7 लाख 9 हजार 847 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 10 हजार 567, तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 99 हजार 280 इतकी आहे. 25 जानेवारी रोजी बंद झालेल्या नोंदणीवेळी पाचवी व आठवीच्या 6717 विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्याने अर्ज प्रलंबित होते. राज्य परीक्षा परिषदेकडून नाव नोंदणी करण्यास 23 ते 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
 
यामुळे त्यावेळी शुल्क न भरल्याने प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज निश्चित करण्याची संधी मिळाली आहे. तसेच वाढीव मुदतीमध्ये अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांना 2 मेपर्यंत शुल्क भरण्यासाठी मुभा दिली आहे. दरम्यान, 30 एप्रिलनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज किंवा 2 मेनंतर शुल्क भरता येणार नाही. अर्ज नोंदणीसंदर्भात राज्य परीक्षा परिषदेकडून www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळांवर सविस्तर माहिती उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना ट्रकने चिरडले

एफडीएने जे. जे. हॉस्पिटलच्या कॅन्टीनसह १० आस्थापनांचे परवाने निलंबित केले तर १३ जणांना अटक

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: मुख्य आरोपी मंदिरात लपून बसला होता; ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेडया

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना वेस्ट इंडिजने ६ गडी राखून जिंकला

"महाराष्ट्रामध्ये ७.९ लाख मतदारांची तफावत," आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

पुढील लेख
Show comments