ganesh chaturthi
✕

शरद पवारांनी “या” प्रकरणाबाबत केली मोठी टीका

Updated: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (00:11 IST)
 
शरद पवार म्हणाले की, तळेगाव हा जो स्पॉट आहे, त्याच्या आजूबाजूचा चाकण आणि रांजनगाव हा ऑटोमोबाईल साठी अनुकूल आहे. इथं जर हा प्रकल्प असता तर कंपनीला अधिक फायदेशीर असता. त्यामुळे तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. महाराष्ट्रामधून हा प्रकल्प जाणे म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे, तसे व्हायला नको होते. तसेच या प्रकल्पाचे ठाकरे सरकावर खापर फोडणे चुकीचे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेआणि उद्योग मंत्री उद्य सामंत यांचे आरोप चुकीचे असल्याचे पवार म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य राज्य असून वाद झाले, तर राज्यामध्ये गुंतवणूक येणार नाही. याशिवाय गुंतवणुकदारांशी संवाद देखील वाढवायला हवा. तसेच नव्या सरकारची गतिमानता चांगली आहे. मात्र सरकारचा कारभार दिसला नसून राज्यकर्ते गतिमान असल्याचे दिसत असल्याचे पवार म्हणाले. तर आताच्या सरकारने राज्यात नवा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावा असेही पवारांनी सांगितले.
 
तसेच आता या प्रकल्पावर चर्चा करून काहीही उपयोग नसून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात पुन्हा आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मदत केली तर त्यांचे स्वागतच करू असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

एकनाथ खडसे यांचा फार्म हाऊसवर संशयास्पद ड्रोन दिसल्याचा आरोप, पोलीस चौकशीची मागणी केली

LIVE: एकनाथ खडसे यांचा फार्महाऊसवर संशयास्पद ड्रोन दिसल्याचा आरोप

नाशिक रिंग रोड-महामार्ग २९ चे आठ दिवसांत फेरसर्वेक्षण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश

युएईच्या उपपंतप्रधानांनी स्मित मच्छर यांच्या शौर्याची प्रशंसा करत त्यांच्या कपाळावर चुंबन घेतले

जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत देशात मोठा बदल होईल...सीजेपी आंदोलनावर संजय राऊत यांचा दावा

पुढील लेख
Show comments