1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (11:27 IST)

शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची?आज सुनावणी राज्यातील जनता थेट पाहू शकेल

uddhav shinde
राज्यात शिवसेना कोणाची या भूमिकेवर आज घटनापीठासमोर सुनावणी होणार असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणी कडे आहे. 5 सदस्यांच्या घटनापीठासमोर सत्तासंघर्षाची सुनावणी होणार असून त्याचे प्रक्षेपण थेट होणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार असून सत्तासंघर्षांचा निकाल थेट राज्यातील जनता पाहू शकेल. 
 
सत्तासंघर्ष साठी सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुरु असून शिंदे गट कोणत्या भूमिकेतून आयोगाकडे गेला असा सवाल कोर्टाने केला आहे. निवडणूक आयोगाचा मुद्दा मूळ याचिकेतून निर्माण झाल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. कपिल सिबब्बल यांच्या युक्तिवादानंतर राजकीय पक्षाचे सदस्य असल्यावर आयोगात दाद मागण्याही हक्क आहे. ठाकरे गटा कडून कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहे .तर शिंदे गटा कडून नीरज कौल युक्तिवाद करत आहे.