शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (11:09 IST)

Pune : पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात काऱ्हाटीच्या कऱ्हा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम संतोष खंडागळे(20) असे या मृत तरुणाचे नाव असून हा संपूर्ण प्रकार त्याच्या आईच्या डोळ्यासमोर घडला. मयत शुभम आईच्या सह नदीवर कपडे धुण्यासाठी आला असता मित्रांसह नदीपात्रात पोहण्यासाठी गेला मात्र त्याला पाण्याच्या अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडू लागला.

त्याला बुडत असताना पाहून त्याच्या आईने आणि सोबतच्या मित्रांनी आरडा ओरड केला. त्यांचे  ओरडणे ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात उडी मारून त्याला बाहेर काढले. दुर्देवाने तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शुभम साताऱ्यात पोलीस भरती अकॅडमीत शिक्षण घेत होता. सुट्टी असल्यामुळे तो गावी घरी आला होता. तो एकुलता एक होता. त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.