शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (21:39 IST)

सप्तशृंगी देवीचे भुसे यांनी घेतले दर्शन, राज्याच्या विकासासाठी केली प्रार्थना (फोटो)

bhuse
महाराष्ट्रातील आद्यशक्तीपीठ व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून मान्यता असलेल्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरूवात झाली असून राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सप्तशृंगी गडावर विधिवत पूजा करून देवीचे दर्शन घेतले. यावेळी  राज्याच्या विकासासाठी आशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना त्यांनी देवीच्या चरणी केली. 
 
यावेळी यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना , उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, ज्योती कावरे, तहसीलदार बंडू कापसे, ट्रस्ट चे पदाधिकारी, ग्रामस्थ  उपस्थित होते.
bhuse
यावेळी बोलताना पालकमंत्री भुसे म्हाणाले, दोन वर्षानंतर सुरू होणाऱ्या सप्तशृंगी गडावरील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी ट्रस्ट व्यवस्थापन, प्रशासनाने पूर्ण तायारी केली असून मूर्ती संवर्धनानंतर आजपासून सप्तशृंगी देवीचे तेजोमय मुळ प्राचीन रूप भाविकांना बघण्यास मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी सप्तशृंगी चरणी प्रार्थना करून राज्यातील जनतेला शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा  त्यांनी यावेळी दिल्या आहेत.