Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्पा तुम्हीच आता महागाई दूर करा - शिवसेना

Updated: शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (14:54 IST)
 
‘महंगाई डायन’नष्ट व्हावी म्हणून 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांच्याच काळात ही ‘डायन’पुन्हा जनतेच्या बोकांडी बसली आहे. त्यात रोजच्या इंधन दरवाढीचा मारही सोसावा लागत आहे. पुन्हा ज्यांनी ही दरवाढ नियंत्रणात ठेवायची, तेच तेलाच्या जागतिक बाजारपेठेकडे बोट दाखवीत आपली जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे महागाईचे विघ्न दूर कर आणि आमचे जगणे सुसह्य कर असे साकडे थेट विघ्नहर्त्या गणरायांनाच घालावे लागेल. बुद्धीची देवता असलेले गणपती राज्यकर्त्यांना जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, हिच अपेक्षा आणि प्रार्थना!
 
चैतन्यदायी आणि श्रद्धावान अशा गणेशोत्सवाला आज सर्वत्र नेहमीच्या उत्साहात सुरुवात होईल. राज्यात सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे थाटामाटात आगमन होईल. मराठी जनमानसात रुजलेल्या श्रद्धेचे रूप म्हणजेच गणेशोत्सव. पुढील दहा दिवस महाराष्ट्राच्या घराघरांत, गल्लीगल्लींत, गावागावांत चैतन्य, श्रद्धा आणि राष्ट्रीय व सामाजिक बांधिलकीचे अपार दर्शन होईल. मराठी माणूस आपले सगळेच सण-उत्सव दणक्यात आणि उत्साहात साजरे करीत असतो, पण गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी आहे! मराठी मनाला ‘जिवंतपणा’ची प्रेरणा देणारे जे उत्सव आहेत त्यापैकी एक गणेशोत्सव. कालानुरूप त्यात जरूर बदल झाले आहेत, होत आहेत, पुढेही होतील. शेवटी बदलत्या काळाचे प्रतिबिंब जसे माणसाच्या जीवनात पडते तसे ते सण-उत्सवांमध्येही पडणारच. त्यामुळे गणेशोत्सवातही बदल दिसतातच. अर्थात या बदलांबाबत वैचारिक मतभेदांचे वारे दरवर्षी गणेशोत्सव आला की घोंघावतात. हे बदल नाकारणारे संख्येने खूप कमी आहेत, पण तरीही आपली नकारघंटा जोरजोरात बडविण्याचा हेका ते सोडत नाहीत आणि त्यामुळे निर्बंधांचा वरवंटा दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांवर फिरतोच फिरतो. त्यात हिंदूंचे सण–उत्सव म्हटले की बंधने, हेटाळणी, टीका अशी विघ्ने हमखास येणारच. कधी मंडपांच्या लांबी-रुंदीवर निर्बंध, कधी लाऊड स्पीकरच्या कर्ण्यावर डेसिबलची मर्यादा कधी दहीहंडीच्या थरथराटावर बंधने, कधी न्यायालयाचा हातोडा, तर कधी प्रशासन व पोलिसांचे दंडुके. अशा अनेक अडथळ्यांची शर्यत हिंदूंच्या सण-उत्सवांना पार करावी लागते. गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. त्यात पर्यावरणवादी नावाचा आणखी एक अडथळा न चुकता दरवर्षी उभा राहत असतो. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील १२४ नवीन आरोग्य सुविधांचे ऑनलाइन उद्घाटन केले

वाराणसी विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने पिस्तूलने गोळीबार, २ कर्मचारी जखमी

राज्य सरकारने एमएमआरडीएसाठी १२१ कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्रात १२४ नवीन आरोग्य संस्थांचे उद्घाटन

नवीन एअर इंडिया इमारतीवर १०६ शहीदांची नावे दिसणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मंजुरी

पुढील लेख
Show comments