Biodata Maker marathi
✕

सिंहस्थ प्रारूप आराखडा पोहोचला 11 हजार कोटींवर

Updated: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (20:22 IST)
 
नाशिकमध्ये  येत्या 2027- 28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थात येणाऱ्या साधू-महंत व भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या नेतृत्वाखाली सिंहस्थ प्रारूप आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीने महापालिकेतील सर्व खातेप्रमुखांकडून आपापल्या विभागाकडून प्रस्तावित सिंहस्थकामे व त्यासाठी लागणारा खर्च यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने 2500 कोटी, मलनिस्सारण विभागाने 627 कोटींचा प्राथमिक आराखडा सादर केला होता.

त्याच धर्तीवर आरोग्य व वैद्यकीय, अग्निशमन, उद्यान, पाणीपुरवठा, जनसंपर्क, घनकचरा विभागानेही कोटीच्या कोटी उड्डाणे गाठल्याने हा आराखडा आठ हजार कोटींवर पोहोचला. त्यात आता भूसंपादन विभागाकडून तीन हजार कोटींची भर पडली आहे. अस्तित्वातील रिंगरोडच्या मिसिंग लिंक, साधुग्रामच्या भूसंपादनाकरिता हा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे सिंहस्थ प्रारूप आराखडा मात्र 11 हजार कोटींवर पोहोचला आहे.
 
वाराणसीच्या धर्तीवर नियोजन
वाराणसीच्या धर्तीवर यंदाच्या कुंभमेळ्याचे नियोजन महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. वाराणसी येथे 2025 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी तेथे कशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याच्या पाहणीसाठी महापालिकेतील अभियंत्यांचे पथक वाराणसीच्या अभ्यासदौऱ्यावर पाठविले जाणार आहे. गंगेच्या धर्तीवर गोदावरी नदीकाठी घाट विकास, प्रदूषणमुक्ती, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण केले जाणार आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

Gold Rate Today आठवडाभरात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार; २४ कॅरेट सोन्याचे ताजे दर तपासा

मंत्र्यांच्या कुत्र्यांचा खर्च ५,००० रुपये, शेतकऱ्यांना तेवढीच मदत! अभिजीत दीपके यांचा सरकारवर हल्लाबोल

LIVE: महाराष्ट्र काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर नाराजी व्यक्त केली

ताबडतोब फ्लॅट परत करा; वृद्ध वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने दिला दणका

"पवारांची पाठीत खंजीर खुपसण्याची सवय अजून गेलेली नाही" — सीमांकनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा संताप

पुढील लेख
Show comments