गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2017 (16:34 IST)

सिंहगड किल्ला आठ दिवस पर्यटकांसाठी बंद

पुण्यात सिंहगड किल्ला पुढील आठ दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर अचानक मोठी दरड कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. ही धोकादायक दरड हटवण्याचं काम  सुरु झालं आहे.  तर उंचावरील दगड काढण्याचं काम उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे.

सिंहगडाच्या सुरक्षेसाठी 1 कोटी 65 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले असले, तरी गेली दोन वर्षे हे पैसे नुसतेच पडून आहेत. या पैशांचा उपयोग धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्यासाठी होणं गरजेचं आहे.