Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा : अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ट्वीट

Updated: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (21:27 IST)
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  घेण्यात येत असणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णात्मक पद्धतीने घेण्यात येणार होती. सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात येणार होता. परंतु, नव्या शैक्षणिक धोरणाचा दाखला देत तो २०२३ पासूनच लागू करण्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवले. याविरोधात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन छेडले. 
 
डिसेंबर महिन्यात झालेल्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत सरकारकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्रही पाठवण्यात आले. मात्र, या पत्राबाबत लोकसेवा आयोगाने कोणताही निर्णय पारीत केला नाही. परिणामी मुख्य परिक्षा तोंडावर आलेल्या असताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन छेडले. नवा अभ्यास आणि नवी परीक्षा पद्धत २०२५ पासूनच लागू करण्याच्या मागणीला त्यांनी जोर दिला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एमपीएससीला पत्र लिहून विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली.
 
दरम्यान, हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न राहता त्याला राजकीय पाठिंबाही मिळू लागला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परवा रात्री आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. तसंच, ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विद्यार्थ्यांच्या भेटीला जाणार होते. परंतु, त्यांच्या भेटीआधीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार, २०२५ पर्यंत जुन्या पद्धती आणि अभ्यासक्रमानुसारच परीक्षा होणार आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

Teachers’ Day Gift Ideas १५० ते २०० रुपयांच्या बजेटमध्ये शिक्षकांसाठी १० सर्वोत्तम भेटवस्तू पर्याय

इस्रोने GSLV-F17 च्या बाझ उपग्रह EOS-05 च्या यशस्वी प्रक्षेपणाने इतिहास रचला

महिलांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो का? नियम जाणून घ्या

GPT-6 Astra ची धमाकेदार एंट्री: जगातील सर्वात शक्तिशाली AI मॉडेल! ५ मोठी वैशिष्ट्ये जी तुम्हाला माहित असायलाच हवीत

नेपाळमधील दुर्घटनेत सुमारे ६०० मुले बेपत्ता,शोधमोहीम सुरू

पुढील लेख
Show comments