गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (21:21 IST)

आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून दांपत्याची आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून पत्नीने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या विरहातून बुधवारी पतीने देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची माहिती आहे. या घटनेमुळे दोन मुले आणि दोन मुली पोरकी झाली आहेत.
 
ही घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे घडली. सुरेखा दळवी आणि संतोष दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
 
पत्नीने सोमवारी (२० फेब्रुवारी) सकाळी विषारी किटक औषध प्राशन करून आत्महत्या केली. तर पतीने बुधवारी (२१ फेब्रुवारी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. सततची नापिकता, विविध बँकेचे कर्ज,अशा आर्थिक विवंचनेतुन शेतकरी दामपत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor