1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 12th student commits suicide before exam in Aurangabad

परीक्षेआधीच 12वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

suicide
आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. त्यापूर्वीच एका धक्कादायक बातमीप्रमाणे औरंगाबाद येथे बारावीची परीक्षा सुरु होण्याच्या काही तासांपूर्वी एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 
 
ही घटना शहरातील एन-8 सिडको भागातील गुरूनगर हौसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. विद्यार्थ्याने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान या विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातूनच आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला आहे. अमन रवींद्र आहेरेवाल (वय 18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन आहेरेवाल हा कुलभूषण गायकवाड महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. अमनचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे तर एक भाऊ पुण्यात नोकरी करतो. दरम्यान बारावीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या अमनने परीक्षेपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. 
 
रविवारी रात्री अमन तिसऱ्या मजल्यावरील अभ्यासाच्या खोलीत झोपण्यासाठी गेला मात्र सोमवारी सकाळी खाली आलाच नाही. तेव्हा दुपारी जेवणासाठी आजोबा अमनला बोलावण्यासाठी गेले असता तो फासावर लटकलेला दिसला. त्यास नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुढील लेख
दिल्लीत बाईक टॅक्सी सर्विस बंद