Dharma Sangrah
✕

महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द; एप्रिल ते जून दरम्यान जनगणनेचे काम होणार

Updated: शुक्रवार, 20 मार्च 2026 (21:07 IST)
 
शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, सर्व अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षकांसाठी जनगणनेचे काम अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांतील शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सुट्ट्यांमध्ये मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही दिल्या आहे.
 
२०११ नंतर प्रथमच होणाऱ्या या जनगणनेत १६ मे ते १४ जून दरम्यान घरांची गणना करून याद्या तयार केल्या जातील. यापूर्वी, एप्रिल महिन्याच्या अखेरीस ते मे महिन्याच्या सुरुवातीस गणक आणि पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाईल. परीक्षेचे काम पूर्ण होताच शिक्षकांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे लागेल.
 
जुलैमध्ये होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, जनगणनेच्या कामामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, ज्यामुळे शैक्षणिक कार्यावर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
 
सुट्ट्यांमध्ये जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना तेवढ्याच दिवसांची विशेष रजा दिली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. तथापि, याचा नवीन शैक्षणिक सत्राच्या कामावर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षकांना वाटते.
ALSO READ: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी लक्षात घेता, विविध ठिकाणच्या दिव्यांग शिक्षकांच्या संघटनांनी या कामातून सूट देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनेही सादर करण्यात आली आहे. 
ALSO READ: अजित पवार यांच्या घराबाहेर 'काळी जादू' केली जात होती का? नाशिकच्या ज्योतिषाचे रहस्य काय; रोहित पवार यांचा मोठा दावा
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, शिवसेना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह करणार

LIVE: ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटीची स्थापना

५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटीची स्थापना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुंबई पोलिसांची कारवाई

रेवंत रेड्डी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट, तेलंगणाच्या मागणीवर अभ्यास समिती स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची बैठक

कोल्हापूरमध्ये झोपलेल्या पतीच्या डोक्यात मुसळाने प्रहार; हत्या करून पत्नी आणि मुलगी पोहचली पोलीस ठाण्यात

पुढील लेख
Show comments